योगामुळे चांगले आरोग्य राखू शकतो:- डॉ. पी. एम. काटकर #chandrapur #spcollegechandrapur

Bhairav Diwase
1 minute read
चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात २१ जून रोजी ''जागतिक योग दिन'' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान योग ही भारताने जगाला दिलेली एक भेट आहे. आज संपूर्ण विश्वात योग दिन साजरा केला जात असून योगामुळे आपण आपले भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राखू शकतो असे प्रतिपादन सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी येथे बोलतांना केले.

येथील सरदार पटेल महाविद्यालयातील शांताराम पोटदुखे सभागृहात जागतिक योग दिनानिमित्याने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांसाठी योग प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख म्हणून चंद्रपूर महिला पतंजली योग समितीचे योग प्रशिक्षक व मार्गदर्शक स्मिता एन. रेबनकर, अंजली साठोणे, रेणुका साठोणे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, एनसीसी प्रमुख डॉ. सतीश कन्नाके, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख आणि रसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खनके, प्रा. विकी पेटकर, प्रा. कांचन रामटेके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

महविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,रसेयोचे स्वयंसेवक,एनसीसी कॅडेट, खेळाडू आणि विद्यार्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन योगासने केलीत. योग शिक्षकांनी योगासनांचे महत्त्व यावेळी सांगितले. यावेळी पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने करण्यात आलीत.केंद्र सरकारतर्फे निश्चित केलेले शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले.