चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे! #Chandrapur

Bhairav Diwase

1) चंद्रपूर पोलीस दलाच्या आस्थापनेवर दिनांक 19 जून 2024 रोजी सकाळी 5 वाजता पासून जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे पोलीस शिपाई भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

2) सदर भरती मध्ये एकूण 137 पोलीस शिपाई व 9 बॅण्डस्मनची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

3) पोलीस शिपाई पदासाठी एकूण 22 हजार 583 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये पुरुष उमेदवार 13 हजार 443 व महिला उमेदवार 6 हजार 315 तसेच 2 तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. बॅण्डस्मन पदाकरिता पुरुष उमेदवार 2 हजार 176 व महिला उमेदवार 646 तसेच 1 तृतीयपंथी उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले आहे.

4) जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील प्रवेशद्वारावर उमेदवाराचे ओळखपत्र बघून (उदा. आधार कार्ड, चालक परवाना, निवडणूक कार्ड इत्यादी) आत मध्ये उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रवेश दिला जाईल. इतर साहित्य प्रवेशद्वारावर जमा करण्यात येईल.

5) उमेदवाराची हजेरी घेऊन त्यांना छाती, उंची मोजमाप करून त्यांचे कागदपत्र तपासण्यात येतील व बायोमेट्रिक हजेरी घेऊन उमेदवार यांना चेस्ट क्रमांक वाटप करून शारीरिक चाचणी करिता मैदानावर पाठवण्यात येईल.

6) मैदानावर उमेदवारांची शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांची 100 मीटर, 1600 मीटर व महिलांची 100 मीटर, 800 मीटर धावण्याची चाचणी ही कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) सिंथेटिक ट्रॅक वर घेण्यात येईल यामध्ये उमेदवारांना स्पाईक शूज (Spike Shoes) वापरता येणार नाही. सिंथेटिक ट्रॅकवर स्पोर्ट शूज (Sport Shoes) वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

7) उमेदवाराने कोणतेही उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही याबाबत त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करून आढळल्यास त्यांना भरतीतून बाद केले जाईल.

8) भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरिता RFID पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे

9) भरती प्रक्रियेमध्ये ही व्हिडिओ शूटिंग तसेच सीसीटीव्हीच्या निगराणी मध्ये घेण्यात येणार असल्याने कोणताही उमेदवार कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये, पोलीस शिपाई म्हणून भरती करून देता असे कोणी बोलत असल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभाग, चंद्रपूर यांच्याकडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे तक्रार करू शकतील

10) बाहेरगावाहून असलेल्या उमेदवारांना रात्रीला झोपण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील ड्रिल शेड मध्ये करण्यात आलेली आहे.

11) जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल.