सुरज ठाकरे यांच्या पुढाकाराने CMPL कंपनीमधील कामगारांना वेतन दर वाढीचे पैसे प्राप्त.

Bhairav Diwase
राजुरा:- सविस्तर वृत्त असे की, नुकताच वेकोली प्रशासनाने बदलत्या किमान वेतनानुसार कामगारांच्या वेतन दरामध्ये वाढ केलेली असून देखील राजुरा तालुक्यातील CMPL धोपताला ओपन कास्ट माईन्स मधील कामगारांना वाढीव वेतनुसार दररोज प्रमाणे रुपये ४५/- देण्यात येत नसल्याची तक्रार कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी केंद्रीय श्रम आयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक- १७ मे २०२४ रोजी यासंदर्भात निवेदन देत तक्रार करत अधिकाऱ्यांना कामगारांच्या हक्काचे पैसे त्यांना देण्यात यावे अशी मागणी केली. यानंतर जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्षांची कंपनी प्रशासनाशी झालेल्या बैठकीत चर्चा केली असता कंपनी प्रशासनाने नवीन वाढीव दर ज्या महिन्यापासून कामगारांना दिले नाही त्या महिन्यापासून कामगारांच्या खात्यात पैसे जमाu करण्यात येईल असा विश्वास देत कंपनीने कामगारांना वाढीव दाराचे पैसे दिले. 

याशिवाय गेल्या एक आठवड्यापासून राजुरा तहसील कार्यालयासमोर CMPL कंपनीने कंत्राट संपुष्टात आल्याने कंपनीमधील काही कामगारांना कामावरून काढल्याने कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याबाबत   श्री. सुरज ठाकरे यांनी कंपनीशी केलेल्या चर्चेमध्ये कंपनी प्रशासनाला *का बरं त्या कामगारांना कामावरून काढण्यात आलं?* असा सवाल केला असता कंपनीचे प्रत्युत्तर 
:- कंपनीचे कामच संपलेले असून सदर कंपनी देखील बंद करण्यात आली आहे त्यामुळे कायद्याप्रमाणे अनावश्यक असलेल्या कामगारांना जबरदस्तीने कामावर घेण्यात येऊ शकत नाही. शिवाय आंदोलनामध्ये सामील असलेल्या  काही कामगारांमध्ये असमाजिक तत्व या आधी कंपनीमध्ये आढळून आले आहे ज्यामध्ये कंपनी आवारात या कामगारांनी इतर कामगारांना मारहाण केली होती ज्या संदर्भात राजुरा येथील पोलीस स्टेशनमध्ये या घटनांबाबत गुन्हे देखील दाखल झालेले आहेत व कंपनी आवारातील CCTV फुटेज मध्ये देखील हा घटनाक्रम आला आहे. त्यामुळे अशा उपद्रवी तत्त्वांना कंपनीने कामावर न घेण्याचे ठरविले आहे. कारण काढलेले कामगार स्वतःच्याच युनियन बनून कंपनीमध्ये राजकारण करतात तर अशा लोकांना आम्ही कसं कामावर घ्यायचं अशी खंत यावेळेस कंपनीने व्यक्त केली असून कंपनी परिसरामध्ये इतर कामगारांना मारहाण करणाऱ्या कामगारांना आम्ही कामावर परत कसे घेऊ असा प्रश्न करत कंपनी परिसरातील शांतता व सुव्यवस्था ही कायम राहावी या अनुषंगाने कंपनी प्रशासनाने या कामगारांना परत कामावर न घेण्याचा निर्णय घेतला व तसेही कायद्याने आम्ही त्या कामगारांना कामावर घेण्यास बंधनकारक नाही..! आमच्या कंपन चे काम संपुष्टात आले असून दुसऱ्या कंपनीमध्ये घ्यायचे की नाही हा कंपनीचा अधिकार आहे. 'कामगार कायद्याने  जितके अधिकार हे कामगारांच्या बाजूने दिलेले आहेत तितकेच अधिकार कंपनीला देखील दिलेले असल्याने कंपनीने कायद्यानुसार या कामगारांना कामावर परत न घेण्याबाबत सांगितले आहे. व काढलेल्या कामगारांना वगळता इतर जी चांगली माणसे/ कामगार आहेत त्यांना भविष्यामध्ये कुठे ना कुठे आम्ही ऍडजस्ट करून घेऊ असे देखील वचन यावेळेस कंपनीने दिले आहे. 
 कंपनीशी झालेल्या चर्चेनंतर  कंपनीने कामगारांबाबत सांगितलेल्या माहितीनुसार  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी सांगितले की असामाजिक तत्त्वांना कुठल्याही पद्धतीने जय भवानी कामगार संघटना सहकार्य करत नाही.