गडचिरोली:- गडचिरोलीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक 22/06/2024 रोजी होणारी पोलीस भरतीची मैदान चाचणी रद्द करण्यात आली आहे. दिनांक 22/06/2024 रोजी मैदान चाचणी असणाऱ्या उमेदवारांची पुढील मैदान चाचणी दिनांक 13/07/2024 रोजी घेण्यात येणार आहे.याबाबत आपणास कळवण्यात येईल.
१)दिनांक 22/06/2024 रोजी असणारी मैदान चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.
२)दिनांक 24/06/2024 रोजी होणारी मैदान चाचणी व त्यापुढील मैदान चाचणीमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.