शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे बाळकडू दिले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व विदर्भ संपर्क नेते भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रात समाज उपयोगी कार्य सुरू आहे.
हा समाजसेवेचा वारसा अविरत सुरू ठेवणाऱ्या जेष्ठ शिवसैनिक,नगरसेवक व आजी - माजी पदाधिकारी यांना सोबत घेऊन शहरातील जनसंपर्क कार्यालयात शिवसेना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांनी केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख जिवतोडे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा भद्रावती वासियांनी कायम ठेवला. व भद्रावती नगर परिषदेतील भगवा अविरत फडकवत ठेवला.तोच वारसा यापुढे सुद्धा कायम राखण्यासाठी मी प्रयत्न करेल.शिवसेनेने अनेकांना घडवल मात्र त्यांनीच शिवसेनेला दगा दिला. मात्र कठीण काळात शिवसेनेला व पक्षप्रमुखांना बळ देण्याचे काम निष्ठावंत शिवसैनिकांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा वरोरा - भद्रावती विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले व सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष प्रफुल चटकी,मा. उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम,तालुका संघटक बाळा क्षिरसागर,युवासेनेचे महेश जिवतोडे, मुकेश मिश्रा, प्रमोद गेडाम, मंगेश ढेंगळे,जितेंद्र गुल्हानी,नागेंद्र चटपल्लीवार, गणेश गावंडे,जितेंद्र गुलानी, अरविंद खोबरे,राजु सबाने,प्रकाश भंडारवार, संदीप भुसेवार, गुरुदेव पिट्टलवार, किर्ति पांडे,सुजाता बगडे,वर्षा पढाल,वैशाली मोघे,अर्चना ठाकरे आदी उपस्थित होते.