ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणी करिता धरणे आंदोलन #chandrapur #Brahmapuri

Bhairav Diwase

ब्रह्मपुरी :- चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली त्यात ब्रह्मपुरी जिल्हा घोषित झाल्याची प्रसारमाध्यमावर बातमी धडकली मात्र रात्र उलटली आणि उलटे ब्रह्मपुरी चे नाव वगळून गडचिरोली जिल्हा घोषित करण्यात आला हा ब्रह्मपुरी करावं फार मोठा अन्याय होता.


ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी 1982 पासून ब्रह्मपुरीकरांनी अनेक आंदोलने केली मागील एका वर्षात ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको, धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन व मोर्चे काढून शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले मात्र सरकारने ब्रह्मपुरीकरांच्या मागणी मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले पुन्हा एकदा ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक 21 जून 2024 ला छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे एकदिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले .या धरणे आंदोलनाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा.अतुल देशकर हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी रास्त आहे विरोधी पक्षनेत्यांनी ब्रम्हपुरी जिल्ह्याचा प्रश्न शासन दरबारी मांडावा त्यांनी पुढाकार घ्यावा आम्ही ब्रम्हपुरी कर त्या मागणीसाठी निश्चितच पाठीशी राहु असे विचार मांडले.तर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन ब्रम्हपुरी जिल्ह्याच्या मागणीला समर्थन दिले आणि ब्रम्हपुरी. शहरात जिल्हा करिता अनेक बाबीची पूर्तता झाली असून प्रशासकीय इमारती निर्माण झाल्या आहेत त्यामुळे ज्यावेळेस सरकार नविन जिल्ह्याची निर्मिती करण्याचे ठरवेल त्यावेळेस निश्चितच आपण ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे सल्लागार देविदास जगनाडे,,हरिश्चंद्र चोले, हर्षल निनावे ,सुनील विखार योगिता बनपुरकर, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात समितीचे निमंत्रक विनोद झोडगे यांनी प्रास्ताविक करून ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी कशी रास्त आहे आणि ते भविष्यात येणाऱ्या पिढीला किती महत्त्वाचा आहे हे पटवून देऊन जोपर्यंत जिल्हा बनणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही अशी भूमिका मांडली तर निमंत्रक प्रशांत डांगे यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे जिल्हा करिता जे आंदोलन झाली त्याची पार्श्वभूमी आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात 28 जून 2024 ला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनात ब्रह्मपुरी करांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या धरणे आंदोलनाच्या वेळेत समितीचे ,राजू भागवत, अविनाश राऊत ,सुरत शेंडे, सुधाकर पोपटे ,सुधीर शेलोकर दत्तू टिकले दीपक नवगडे , रक्षित रामटेके, प्रशांत घुटके,सुधा राऊत,सरला रामटेके,रीना मेश्राम ,सुशीला सोंडवले, केशव करंबे, विजय बनपुरकर ,भगवान कन्नाके,दिलीप जुमडे,मंगलदास गायगवळी तसेच तालुक्यातील अनेक जिल्हा प्रेमी उपस्थित होते.धरणे आंदोलनानंतर समितीच्या वतीने मान मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूल मंत्री महाराष्ट्र शासन यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत ब्रम्हपुरी जिल्ह्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन राजू भागवत तर आभार सुधाकर पोपटे यांनी मानले.