निरोगी जीवन जगण्यासाठी योगासन गरजेचे:- डॉ. राजीव वेगीनवार #pombhurna #chandrapur

Bhairav Diwase


पोभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे दिनांक 21 जून 2024 रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगीनवार सर, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संतोष कुमार शर्मा सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वेगीनवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि योगाचे आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे महत्त्व आहे हे उपस्थितांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे प्रा. संतोष कुमार शर्मा सर यांनी योगासनांचा आपल्या प्रकृतीवर पडणारा चांगला प्रभाव याची सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. बाळासाहेब कल्याणकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे योगदान लाभले.