भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना 9 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. T-20 विश्वचषक 2024 मध्ये (T-20 World Cup 2024) भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 वा सामना खेळवला जाईल. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील हा शानदार सामना होणार आहे. या सामन्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. परंतु या सामन्याआधी अनेकांच्या मनात प्रश्न असतील की या सामन्याची ऑनलाईन आणि मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे. या सामन्याचे भारतीय वेळेनुसार प्रक्षेपण कधी होईल? यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारताचा पहिला साखळी सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. भारताचा संघ 4 साखळी सामने खेळणार आहे. यामध्ये भारताचा दुसरा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यांनतर भारताचा सामना यूएसएविरुद्ध होणार आहे. हा सामना 12 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. या सामन्याचे आयोजन 15 जून करण्यात आले आहे. या ग्रुपमधील पहिले दोन संघ पुढील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी प्रयत्न करतील.
कुठे होणार भारत-पाक सामना?
T-20 विश्वचषक 2024 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
कुठे पाहू शकता सामन्याचे थेट प्रक्षेपण?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवार, 09 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे, जो सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. मात्र, भारतीय वेळेनुसार हा सामना भारतात रात्री आठ वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'फ्री' असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.