चाकूने भोसकून मित्रानेच मित्राला संपवलं
जालना:- किरकोळ वादातून मित्रानेच मित्राला चाकूने भोसकून संपवल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. जालन्याच्या चंदनझिरा भागात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्यात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. सैय्यद नदीम सैय्यद रहीम असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील चंदनझिरा परिसरात ही घटना घडली.
सैय्यद नदीम सैय्यद रहीम या तरुणाची किरकोळ कारणावरून आपल्या मित्रांशी बाचाबाची झाली. याच वादातून त्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीत आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चंदनझीरा पोलिसांन दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.