'वंचित'चा सुफडा साफ! दोन जागा वगळता सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त #Mumbai #VBA #chandrapur

Bhairav Diwase


मुंबई:- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 35 जागांवर उमेदवार आपले उमेदवार उभे केले होते. यातील सहा जागांवर माविआला पाठिंबा दिला होता. कोल्हापुर, सांगली, बारामती आणि नागपुरमध्ये त्यांनी उमेदवारांना पाठिंबा दिला होता, तिथे वंचितचे उमेदवार उभे नव्हते.



मात्र प्रत्यक्षात वंचितला या निवडणुकीत अपयश मिळाले. या पक्षाला फक्त 15 लाख 66 हजार 949 मतदान मिळाले आहे. अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात वचिंतच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाले आहे



वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. अनेक ठिकाणी तर वंचितच्या उमेदवारांना 5 ते 10 हजाराचा मतांचा टप्पाही पार करता आला नाही. अकोला लोकसभा मतदार संघातून स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली, मात्र जास्त मतं घेऊन त्यांचा येथे पराभूत झाले आहेत. अकोल्यातून अनुप धोत्रे यांचा विजय झाला आहे. मात्र वंचितच्या उमेदवारांचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. मुंबई उत्तर पश्चिम, अकोला, हातकणंगले आणि बुलढाण्यात वंचितचा फटका बसला.


महाविकास आघाडीला वंचितचा फटका


मुंबई उत्तर-पश्चिम मध्ये ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला. येथे वंचितच्या परमेश्वर रणशुर यांना 10,052 मते मिळवली. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे यांचा 40,626 मतांनी विजय मिळाला. तर तिसऱ्या क्रमांकावरील प्रकाश आंबेडकरांना 2,76,748 मते मिळाली. Lok Sabha Election Results 2024



हातकणंगलेत ठाकरे गटाचे सत्यजीत आबा पाटील यांचा 13,426 मतांनी पराभव जिथे वंचितच्या डी सी पाटील यांना 32,696 मते मिळाली. बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा 29,479 मतांनी पराभव झाला. वंचितच्या वसंतराव मगर यांना 98,441 मते मिळाली. दरम्यान अकोला आणि हिंगोली वगळता सर्वच ठिकाणी वंचितला लाखाच्या खाली मतदान मिळाले. Lok Sabha Election Results 2024 |



माविआसोबतची जागा वाटपावरील चर्चा अपयशी


यंदाच्या निवडणुकीत माविआत वंचितला पाच ते सहा जागांची ऑफर देण्यात आली होती. पण जागा वाटपावरुन बोलणी यशस्वी होऊ न शकल्याने एकला चलोचा नारा दिला. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत वंचितच्या सर्व उमेदवारांचा सुफडा साफ झाला आहे.