Click Here...👇👇👇

शिवीगाळ केल्याने पिता-पुत्राने केला युवकाचा खून #murder #nagpur

Bhairav Diwase

नागपूर:- दारु पिऊन मित्राच्या वडिलांना शिविगाळ केल्यामुळे वडिल आणि मुलाने एका युवकाच्या डोक्यावर लाकडी दांडा, विटा व दगडी पाटा मारून त्याचा खून केला. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २६ जूनला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राला अटक केली आहे.

राकेश प्रकाश गमे (२५, रा. एम. बी. टाऊन, मिनिमातानगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर मनोज एकनाथ राजुरकर (३०) व एकनाथ महादेव राजुरकर (६५) दोघे रा. गितानगर झिंगाबाई टाकळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मृतक राकेश आणि आरोपी मनोज हे ऐकमेकांचे मित्र होते. राकेश काही कामानिमित्त मनोजची दुचाकी घेऊन गेला होता. बुधवारी २६ जूनला मनोजची दुचाकी परत करण्यासाठी राकेश दुपारी ३.३० वाजता मनोजच्या घरी गेला. तेथे दोघेही दारु घेऊन असल्यामुळे त्यांच्यात वाद झाला.

वादात राकेशने मनोजच्या वडिलांना शिविगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोज आणि त्याचे वडिल एकनाथ यांनी लाकडी दांडा, विटा व दगडी पाटा डोक्यावर मारून राकेशला गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मृतक राकेशची आई ताईबाई प्रकाश गमे (५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल कांबळे यांनी आरोपी पिता-पुत्राविरुद्ध कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास मानकापूर पोलिस करीत आहेत.