नागपूर:- काटोल तालुक्यातील वाढोणा येथे मावशीकडे गंगापूजनासाठी आलेल्या 7 वर्षीय शिवम मोहरिया याचा कुलरला हात लागल्याने विजेचा धक्का बसून मृत्य झाला. तर शुक्रवारी (दि. 7) नागपूर शहरातील इमामवडा येथील 7 वर्षीय रुतवा बगडे याचा घरातील कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसून मृत्य झाला.
याशिवाय 30 एप्रिलरोजी बारा सिग्नल जवळील बोरकर नगर येथील 6 वर्षीय आकांक्षा संदेले या मुलीचा खेळताना कुलरला हात लागल्याने मृत्यू झाला. अशाप्रकारे जिल्ह्यातील तीन मुलांचा कुलरने बळी घेतला. अशा घटना टाळण्यासाठी कुलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.