टीम इंडिया आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत यजमान यूएसए विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी आधीच्या दोन्नही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि मोनांक सिंह यूएसएचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात यजमान यूनायटेड स्टेट्स विरुद्ध टीम इंडिया हे दोन्ही संघ आमेनसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या सामन्यात विजय मिळवून सुपर 8 मध्ये स्थान निश्चित करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे, मात्र त्यात एकच टीम यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याच चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.