Click Here...👇👇👇

सुट्टीला घरी आलेली 13 वर्षीय लेक; बापानेच केलं गरोदर अन्..... #Chandrapur #nagbhid

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यात एक 13 वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आश्रम शाळेतून आपल्या घरी परतली होती. मात्र, इथे बापानेच पोटच्या मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. बापाने धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावातील आहे. या गावाता पती, पत्नी आणि दोनं मुलं राहतात. पोट भरण्याकरता पैसे कमावण्यासाठी या व्यक्तीची पत्नी एप्रिल महिन्यात कामासाठी दुसऱ्या राज्यात गेली होती. याच काळात मुलीच्या शाळेला सुट्टी लागली आणि ती आश्रम शाळेतून घरी परतली. इथे पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत बापानेच मुलीवर बलात्कार केला.

हा राक्षस बाप मुलीला धमकी देत वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता आणि तिला शांत राहण्यास सांगत होता. काही दिवसांनी मुलीची शाळा पुन्हा सुरू झाली आणि ती शाळेसाठी परतली. यावेळी शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली.

मुलीची चौकशी केल्यावर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. यानंतर शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरुन नागभीड पोलिसांनी आऱोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.