दहा घरांना पिण्याचे पाणीही मिळत नाही
विधाते यांचे घर कान्सा गट ग्राम पंचायत अंतर्गत येते. त्यांच्या घरासमोर घाणीचे साम्राज्य असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मागील एक वर्षापासून त्यांना आणि त्यांच्या सभोवतालच्या दहा घरांना पाणी मिळत नाही. त्यात सुनील उताने, जी.बी.आत्राम, विठ्ठल बोथले, लक्ष्मण भोयर, श्रावण डाखरे, देवळे, गुलाब खेरे, लेडांगे, शकुंतला दातारकर, विठ्ठल विधाते यांचा समावेश आहे. वारंवार तक्रार देऊनही अद्याप दखल घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. आमची समस्या त्वरित सोडवावी अशीही मागणी विधाते यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.