स्व. दादासाहेब देवतळे जिनिंग सहकारी संस्थाचा अध्यक्षपदी करण देवतळे #warora

Bhairav Diwase
वरोरा:- वरोरा येथील सहकार महर्षी स्वर्गीय दादासाहेब देवतळे जिनिंग प्रोसेस सहकारी संस्था मर्यादित वरोरा रजिस्ट्रेशन नंबर १९९५ तालुका वरोरा व्यवस्थापन समिती 2023 - 2024 निवडणुक पार पडली.

यावेळी अध्यक्ष पदासाठी करण देवतळे, उपाध्यक्ष पदासाठी चंपतराव साळवे, सचिव पदासाठी राजुपाटिल झाडे अशा तिन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी. टि. येवले यांनी काम पाहिले.

अध्यक्ष पदि करण संजय देवतळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक, सभासदांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी युवा नेत करण देवतळे आपल्या भाषणातून म्हणाले या संस्थेला पुढे नेण्याकरीता मी सदैव कार्य करील म्हणून आश्वासित केले.

यावेळी संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठल भोयर, मारोती येरेकार, रामदास पाटिल डहाडकर, यशवंतराव घोडमारे गुरुजी, दिपकजी यावले, सदाशिव चिंचोलकर, सुधीरजी धामट, चंद्रकला तोडे, पार्वता नन्नावरे, शंकर पचारे, अर्जुन थुटे यांनी सुध्दा अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छापर आशिर्वाद दिला.