कोरपना:- गडचांदूर शहराला नगरपरिषद होऊन दहा वर्षे पूर्ण होत आहे तरी देखील गावातील समस्या मात्र जैसे थैच आहे आज मोकाट कुत्रे व मोकाट गुरेढोर यांचा धिंगाणा असतो. केव्हा कोणते कुत्रे कोणाला चावल याचा नेम नाही याआधी सुद्धा अनेकांना कुत्र्यांनी चावून जखमी सुद्धा झाले व काहींचा जीव सुद्धा गेला तर गुर ढोरा वासरामुळे अनेक जणांचे अपघात झाले त्या अपघातामध्ये काही जणांचा जीव सुद्धा गेला आहे यावर नगरपरिषद प्रशासन थातूरमातूर कारवाई करून एखादा वेळेस ढोराना कोणवाळ्यात डांबून पुन्हा सोडले जाते अशीच परिस्थिती जर समोर राहली तर नगरपरिषद कशाला म्हणायचं त्यापेक्षा तर ग्रामपंचायत बरी होती असं मत बिडकर यांनी मांडले मुख्याधारी हे कार्यालयात पूर्ण वेळ राहत नाही कारण त्यांच्या कडे चार चार नगर पालिकाचां कारभार आहे.
या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी बिडकर यांनी केली आहे.