सुरज ठाकरे यांनी केली २०२४ च्या राजुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात.

Bhairav Diwase
नुकत्याच पार पडलेल्या चर्चासत्र व आढावा बैठकीच्या कार्यक्रमांमध्ये शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश

राजुरा:- सविस्तर वृत्त असे की, रविवार दिनांक- १४ जुलै २०२४ ला सम्राट सेलिब्रेशन हॉल, राजुरा येथे आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचा आढावा बैठक व चर्चासत्राचा कार्यक्रम पार पडला. व याच कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री. सुरजभाऊ ठाकरे  कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर व संस्थापक अध्यक्ष जय भवानी कामगार संघटना यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ या कार्यक्रमांमध्ये फोडून सुरुवात केली. या कार्यक्रमांमध्ये आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून भाषणादरम्यान पदाधिकाऱ्यांनी 2024 च्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचाचं आमदार राजुरा विधानसभेमध्ये निवडून येईल याकरिता आम्ही सज्ज आहोत अशी घोषणा केली. 

या कार्यक्रमांमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध भागातील आलेल्या जेष्ठ तथा बेरोजगार तरुण-तरुणी यांनी या आधीच्या आमदारांवर नाराजी व्यक्त करत राजुरातील असंख्य बेरोजगार कामगारांच्या भवितव्यासाठी तथा राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाचे परिवर्तन घडवून आणण्याकरिता श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा भावना व्यक्त करत या प्रचाराच्या प्रारंभ कार्यक्रमांमध्ये सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कारण सुरज ठाकरे हे आमदार तथा खासदार सारख्या पदावर नसताना देखील गेल्या पंधरा वर्षापासून राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेत जनतेच्या विविध प्रकारच्या समस्यांचे आपल्या स्तरावर प्रशासनाला लढा देत निवारण करण्याची त्यांची धडाडीची निडर  कार्यशैली जो मुद्दा एकदा हाती घेतला ती मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलने- उपोषणे करून जनतेला न्याय मिळवून देणे ही त्यांची ओळख आहे. 2009 मध्ये आयुष्याच्या 26 व्या वर्षी यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली. याशिवाय कामगारांवर अन्याय होऊ नये याकरिता  04/02/2009 ,ला अंबुजा सीमेंट, ऊपरवाही, येथे भव्य आंदोलन उभारण्यात आले होते हे एकमेव राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये गाजलेलं सुरजभाऊ ठाकरे यांचा आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये सुरज भाऊ यांचा सह असंख्य कार्यकर्त्यांनी लाठ्या -काट्या खाल्ल्या परंतु आंदोलन मागे घेतले नाही, त्यांच्या याच कार्याला प्रेरित असलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील वासियांच्या बाहेर आलेल्या भावना राजुरा विधानसभा क्षेत्राचा आमदार होण्याचे स्वप्न हे आता एकटे सुरजभाऊ ठाकरे यांचे नसून राजुरा विधानसभा क्षेत्रातील असंख्य चाहत्यांचे आहे..! व ते आम्ही नक्की पूर्ण करणार अशा स्फूर्तीने कार्यक्रमांमध्ये शेकडो तरुणांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे-.

श्री. रोशन हरबडे, शंकर टेकाम, कुमार काचेवार, राजू दुबे, श्रीकांत येमूलवार, सुनील येवले, राहुल कांबळे, केतस ढुंमणे, विनोद काकडे, सत्यवान गेडाम, किरण हस्तक, गणेश रणदिवे, दिलीप विरटकर, तुळशीराम चहाटे, बजरंग पेटकर, कलिफनाथ लांडगे, शंकर कारेकर, अशोक निखाडे, साईनाथ मोहुरले, दिवाकर नागोसे, दया मोहरले, प्रशांत काळे, नागेश काळे, गजानन मोहुर्ले, दीपक कुचनकर, संजय मोहुर्ले, सुरेश मोहुर्ले, संजय बुटले, ओम कोचेकर आदींनी पक्षप्रवेश केला. यावेळेस 'आयोजक श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्यासह आम आदमी पक्षातील संपूर्ण जिल्ह्याचे उपस्थित पदाधिकारी श्री. मयुर राईकवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, जेष्ठ नेते श्री. सुनील मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. नागेश्वर गंडलेवार,जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरज शहा, श्री. रवी पुप्पलवार शहराध्यक्ष बल्लारशा, श्री. योगेश गोखरे महानगर अध्यक्ष चंद्रपूर, श्री. असिफ हुसेन शेख बल्लारपूर, सौ. तब्बजूम शेक महिला शहर अध्यक्ष चंद्रपूर, श्री. जावेद शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष चंद्रपूर, श्री. संतोष बोपचे, सौ. किरण खन्ना बल्लारपूर, श्री. सुनिल राठोड तालुका अध्यक्ष जिवती, श्री. आशिष कुचनकर सहसंघटक कोरपना, श्री. मिलिंद सोनटक्के शहराध्यक्ष गडचांदूर, श्री. राजु चौधरी गडचांदूर, श्री. अनिकेत मेश्राम, तालुका अध्यक्ष ज भ का सं राजुरा, श्री. गणेश सिलगमवार शहर उपाध्यक्ष बल्लारपूर, श्री. लहू कांबळे, श्री. समीर देवघरे, सौ. प्रतीक्षा पिपरे महिला संघटक राजुरा, सरिता कोंडावर महिला सह संघटक राजुरा, श्री. दामोदर गडपल्लीवार संघटक गोंडपिपरी, श्री. तिरुपती झाडे गोंडपिपरी, श्री. निखिल पिदूरकर इरई आदी पदाधिकारी उपस्थित होते.