शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख #chandrapur #mul

Bhairav Diwase

मुल:- मुल तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. शेतकरी हतबल झाला आहे,मुल तालुक्यातील काही गावातून सिंचाई विभाग सावली अंतर्गत नहर,पाट फिस्कुटी, चांदापुर,जूनासुरला, गडीसूर्ला,विरई, दुगाळा, बेबाळ, भोवरला,घोसरी, भेजगाव व आदी गावांतील शेतकरी यांनी सावली येथील सिंचाई विभाग येथे वारंवार आसोला मेडा, गोसीखुर्द धारणाचा पाणी सोडण्याचे विनंती करून प्रशासन दखल घेत नव्हता.या परिसरातील शेतकरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांना फिस्कुटी येथे बोलावून परिसरातील शेतकऱ्यांनी आपली केपियत मांडली या परिसरात पावसाने दडी मारली आहे.

या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध असून सिंचाई विभाग सावली अंतर्गत हरह गेलेला आहे व परिसरात शेतात पाईप लाईन टाकण्यात आली आहे या द्वारे असोला मेंढा व गोसीखुर्द धरनाचा पाणी सोळण्यात यावा अशी गळ जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांचा कडे मागणी केली संदीपभाऊ गीऱ्हे यांनी समस्या ऐकून घेत सिंचन विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे बोलीत तत्काळ पाणी सोडण्याची विनंती केली.व दोन तीन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकऱ्यासह उग्र आंदोलन केल्या जाईल अल्टिमेट दिला. सिंचाई विभागाचे अभियंता भरटकर यांनी मागणी रास्त आहे. शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लागेल २०, तारखे पर्यंत पाणी सोडण्याचे अस्वस्त केले. शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे फिसकुटी,विरई,चिचाळा, तडाऴ,हळदी,गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले.