🎆
गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना मागील अनेक वर्षापासून करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा तक्रारीनुसार प्रश्न पत्रीकेतील उत्तरे बरोबर सोडवून देखिल गुण मिळत नाही मात्र पुर्ण मुल्यांकना दरम्यान तेच विषय उत्तीर्ण होता पुर्ण मुल्यांकनासाठी मागविलेल्या उत्तर पत्रीकांची छायाप्रती फार उशिरा मिळततात व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच पुर्ण मुल्यांकनानंतर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांची शुल्क परत करण्यात येत नाही. इतर विद्यापीठाच्या तुलनेतत गोंडवाना विद्यापीठाची परिक्षा शुल्क फार जास्त आहे. अशा अनेक समस्यांचा सामना विद्यार्थी करत आहे. गोंडवाना विद्यालयातील महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी बहुतांश अतिदुर्गम बहुल भागातील असुन गरीब असल्याने ह्या विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रणाली वरुन विश्वास कमी होऊ नये व ह्यांच्यावर होणारा अन्याय समस्यांचे निराकरण करुन तात्काळ दुर करावा असे निवेदन भारतीय जनता पार्टीचे, युवा वॉरीयरचे अध्यक्ष सोहम बुटले व चमुने विजय शर्मा, रोहन वाडवे, रिशा भास्कर, प्रणव गोरे, वेदांत निमकर, हर्षल कोंडेहार, अनिकेत अनमलवार, क्षितिज वानखेडे, उत्कर्ष शेंडे, धृव जोशी, भारत कदम, अनुशूल वैरागडे, प्र. उपकुलगुरु डॉ. श्रीराम कावळे ह्यांना दि. १२.०७.२०२४ ला दिले. सदर उपक्रमाचे कौतुक विद्यापीठाचे सर्व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. सर्व समस्यांचे निराकरण तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन डॉ. कावळे ह्यांनी दिले आहे.