विनोद थेरेसह कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंगेस जिल्हाध्यक्ष यांनी नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात विनोद थेरेसह कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र त्या भेटीत चर्चा निष्फळ ठरली. व जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करण्याच्या सुचना खासदारांनी दिल्या. त्यामुळे थेट आता प्रदेशाध्यक्षांच्या दारात विनोद थेरेसह कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्ते पोहचणार असून पोंभुर्णा तालुकाध्यक्षपदी पाल यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी विनंती करणार आहेत. परंतु अद्यापही भेटीची तारीख ठरलेली नसल्याने येत्या काही दिवसात भेट होईल. असे विनोद थेरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत विनोद थेरेसह कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 15 दिवसात निर्णय न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा अल्टिमेटम जिल्हाध्यक्षाना दिला होता. तो अल्टिमेटम आता संपला असून प्रदेशाध्यक्ष यांची भेट झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे विनोद थेरे यांनी म्हटले.
पोंभुर्णा तालुक्यातील पक्षाची सुत्रे सांभाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा कॉंगेस जिल्हाध्यक्षांनी वासुदेव पाल यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र पोंभुर्णा तालुक्यात नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांच्या निवडीची माहिती कळताच तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी पाल यांच्या निवडीचा कडाडून विरोध केला. यासंदर्भात आधी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद थेरे यांनी पत्रकार परिषद घेत नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांच्यावर आरोप केले. त्यांनतर लगेच दुसऱ्या दिवशी तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांनी पत्रकार परिषद घेत मी कॉंगेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्यावरचे आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत अशी माहिती दिली.
चंद्रपूर जिल्हाध्यक्ष या रंगलेल्या कलगीतुऱ्यात हस्तक्षेप करायला हवे होते मात्र तसं झालं नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या भेटीत काय निर्णय होतो, यावर राजीनामे सत्र अवलंबून आहे. मात्र पोंभुर्णा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांच्या भेटीनंतर काय निर्णय घेणार याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.