चंद्रपूर:- मुल्यांकन स्वयंप्रेरणेने करण्यात येते. अलीकडेच २०२३-२४ सत्रासाठी देखील 'इंडिया टुडे' ने मूल्यांकन करून 'बेस्ट कॉलेज ऑफ इंडिया' अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयातील शाखांच्या मानांकनामध्ये येथील सरदार पटेल महाविद्यालयातील सर्वच शाखांना मानांकनात स्थान मिळाले आहे.
सर्वोत्कृष्ट मानांकनात फॅशन विभागाला ५३, तर जनसंवाद विभागाला राष्ट्रीय स्तरावर ५५ वा क्रमांक मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पालकांना आपल्या पाल्याला प्रवेश देताना उत्कृष्ट महाविद्यालय निवडण्यासाठी या मानांकनाचा उपयोग होतो. हे मानांकन ठरवताना 'इंडिया टुडे' मासिकातर्फे महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा, इमारत, विद्यार्थ्यांचा परीक्षेतील गुणानुक्रम, उपलब्ध प्राध्यापकांची संख्या, शैक्षणिक व इतर उपक्रम, विद्यार्थ्यांना दिलेल्या नोकरी विषयक संधी, प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, अभ्यासक्रमाची पातळी इत्यादी बाबींचा अहवाल मागविण्यात येतो. त्या आधारावर या मानांकनाची क्रमवारी प्रसिद्ध करण्यात येते.
नुकतीच ती 'इंडिया टुडे' च्या १० जुलै २०२४ च्या विशेष अंकात प्रकाशित करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयातील फॅशन विभागाला ५३ वे स्थान, जनसंवाद विभागाला ५५, विज्ञान विभागाला ११७ वे स्थान मिळाले आहे. संगणकशास्त्र शाखेला ११७, वाणिज्य शाखेला १४०, तर कला शाखेला १७० व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.
शाखांच्या मानांकनामध्ये देखील किमान प्रवेश शुल्क आकारणाऱ्या अभ्यासक्रमात पहिल्या दहात सरदार पटेल महाविद्यालयातील फॅशन डिझायनिंग विभागाला पहिले, संगणकशास्त्र व जनसंवाद अभ्याक्रमाला पाचवे स्थान मिळाले आहे. ते विदर्भातील एकमेव ठरले आहे.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.