मुल तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न #chandrapur #mul

Bhairav Diwase
मुल:- तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी गावातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

यावेळी पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिषभ कावटवार, मुल शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, उपतालुका प्रमुख, चेतन मूगमोडे व आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संदिप भाऊ यांनी आपल्या भाषांनातून शिवसेनेचे कार्य, रोजगार मेळाव्या विषयी माहीती देऊन जास्तीत जास्त संख्येने सुशिक्षित युवक युवती यांनी मेळाव्यात येऊन सहभाग नोंदवा वा असं आवाहन करण्यात आले.