करियर कट्टा उपक्रमाचा आजच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा:- यशवंत शितोळे
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
सरदार पटेल महाविद्यालयात WhatsApp Group Join
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचे कशा पद्धतीने नियोजन करावे या संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टीं विषयी माहिती दिली. प्रामुख्याने सुखी आणि समृद्धी आयुष्य घडविण्यासाठी करिअरचा ई.एम.आय.नेमका काय हे सांगितले. आणि कशा पद्धतीने भरावा आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व दिले जाते हे अनेक उदाहरण देऊन सांगितले.
त्यानंतर भय्याजी येरणे यांनी मार्गदर्शन करीत असताना सांगितले की, यशस्वी होण्यासाठी अत्यंत कठोर मेहनत आणि परिश्रम केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. कारण यश प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असा आनंद हा आपल्याला मिळतो आणि त्यामुळे आपल्या सर्व कुटुंबियांचं समाजातील स्थान उंचावते. त्यासाठी आर्थिक परिस्थितीचे भांडवल नकरता परिश्रम करून यश संपादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणी वर मात करा असे आवाहन केले. तसेच श्याम हेडाऊ यांनी मार्गदर्शन करताना म्हटले कि, विविध पुस्तकांचे वाचन करून आपले आयुष्य बदलवता येते असे सांगितले. आणि हे सर्व पुस्तक आपल्याला करिअर कट्टा मार्फत सहज उपलब्ध होत आहे असे सांगितले. विद्यार्थ्याने यशस्वी होण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त असणारे विविध पुस्तकांचे वाचन करा असे आवाहन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनींना करिअर करण्यासाठी योग्य नियोजन करा त्याचबरोबर विद्यार्थी असतांना विविध कौशल्य विकसित करून घ्यावे असे सांगितले. विद्यार्थीदशेत कौशल्यप्राप्त केल्यास यातील अनेक विद्यार्थी उत्कृष्ट असे अधिकारी घडू शकतात तर काही विद्यार्थी उत्कृष्ट असे उद्योजक घडतील परंतु हे सर्व करण्यासाठी सातत्याने मेहनत, चिकाटी यांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, प्रमुख मार्गदर्शक यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, भय्याजी येरणे, सहा. आयुक्त, कौशल्य विकास, एम. एस., उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रा. श्याम हेडाऊ, प्रा. सायली लाखे, डॉ. अपर्णा धोटे, डॉ. प्रकाश बोरकर, डॉ. संदेश पाथर्डे, करिअर संसदेतील मुख्यमंत्री सानिया खान मंचावर उपस्थित होते. करिअर संसदेतील सर्व पदाधिकारी व विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करिअर संसदचे माहिती व प्रसारण मंत्री कु. प्रांजली खनके यांनी केले तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार करिअर संसदचे कौशल्य विकास मंत्री अपेक्षा भालेराव हिने मानलेत. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
करिअर कट्टा मंत्रीमंडळाची स्थापना...
मुख्यमंत्री सानिया खान, नियोजन मंत्री अश्मित लंगोटे, कायदे व शिस्तपालन मंत्री स्नेहल भिवनकर, सामान्य प्रशासन मंत्री तृष्णा झिमडी, माहिती व प्रसारण मंत्री प्रांजली खनके, उद्योजकता विकास मंत्री कुश यादव, रोजगार-स्वयंरोजगार मंत्री केशव शर्मा, कौशल्य विकास मंत्री अपेक्षा भालेराव, संसदीय कामकाज मंत्री पूर्वा अरेकर, सदस्य हिरेंद्र शेजपाल