चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय सिनिअर सेपक टकरा निवड चाचणी होणार #chandrapur #sepaktakraw

Bhairav Diwase
चंद्रपूर:- ३४ वी सिनिअर महाराष्ट्र राज्यस्तरीय सेपक टकरा (मुले व मुली) अजिंक्यपद स्पर्धा 9 ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान ठाणे येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचा संघ सहभाग करण्याकरिता सेपक टकरा असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक 28 जुलै 2024 रोजी ठीक सकाळी 10:00 वाजता इंडोर हॉल, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे.

सेपक टकरा असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना सोबत येताना 3 प्रत आधार कार्डची झेरॉक्स व 3 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचे सेपक टकरा असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ ३४ वी सिनिअर महाराष्ट्र राज्यस्तरीय सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धा, ठाणे येथे दिनांक 9 ते 11 ऑगस्ट 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

त्यासाठी इच्छूक खेळाडूंनी नरेश चंदेल (7769034966) हर्षल क्षिरसागर (7066916570), रुचिता आंबेकर (8552925066), स्वप्निल धोडरे (9309806706), रितिका रायपुरे (8999789110) अभिमन्यू आर्या (7020933248) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.