चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
वरोरा:- वरोरा तालुक्यात आईने हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वायगाव खडतकर येद येथे आईने हातातून मोबाईल हिसकावल्याच्या रागातून तरुणीने गळफास घेतला. करिष्मा प्रभाकर माने (वय 20) असे मयत तरुणीचे नाव आहे. राहत्या घरी गळफास घेत तिने आत्महत्या केल्याने माने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास योगेंद्र सिंह यादव हे करत आहेत.