चंद्रपूर:- दिनांक 19 जुन, 2024 पासुन ते 19 जुलै, 2024 पावेतो घेण्यात आलेले चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई व बॅण्ड्समन भरती प्रक्रियाची मैदानी चाचणी आज रोजी पुर्ण झालेली आहे.
Also Read:- चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2022-23
चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई (महिला/पुरुष/तृतीयपंथी) चे एकुण 137 पदाकरीता 19740 आवेदन अर्ज आणि बॅण्डसमन (महिला / पुरुष /तृतीयपंथी) चे एकुण 09 पदाकरीता 2815 आवेदन अर्ज असे एकुण 22555 आवेदन अर्ज प्राप्त झाले आहे.
त्यापैकी पोलीस शिपाई (महिला/पुरुष/तृतीयपंथी) चे मैदानी चाचणी करीता 9123 पुरुष, 4679 महिला आणि 02 तृतीयपंथी असे एकुण 13804 उमेदवारांनी मैदानी चाचणी प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. तर बॅण्डसमन (महिला/पुरुष/तृतीयपंथी) चे मैदानी चाचणी करीता 2169 पुरुष, 645 महिला आणि 01 तृतीयपंथी असे एकुण 2815 उमेदवारांनी मैदानी चाचणी प्रक्रिया पुर्ण केलेली आहे.
दिनांक 19 जुन, 2024 पासुन ते 19 जुलै, 2024 पावेतो घेण्यात आलेले चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई व बॅण्ड्समन भरती प्रकियेची संपुर्ण मैदानी चाचणी ही जिल्हा क्रिडा संकुल चंद्रपूर येथे घेण्यात आली असुन त्यासाठी श्री विनय गौडा जी.सी., जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे सहकार्याने जिल्हा किडा अधिकारी श्री अविनाश पुंड यांनी मोलाचे सहकार्य मिळाल्याने संपुर्ण किडा संकुल पोलीस दलास उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे पावसाळयात मैदानी चाचणी प्रक्रिया पार पाडण्यास सुलभ झाली आहे. मैदानी चाचणीची संपुर्ण प्रक्रिया ही दररोज नियमित पहाटे 03:00 वाजेपासुन सुरु करण्यात येत असल्यामुळे पोलीस भरती बंदोबस्ताकरीता नेमण्यात आलेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन लिपीक कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेवुन वेळेवर हजर राहुन संपुर्ण भरती प्रक्रिया अंत्यत पारदर्शक पध्दतीने तसेच प्रामाणिकपणे व जबाबदारीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे नेतृत्वात व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे.
याकरीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन श्री विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि श्री अविनाश पुंड, जिल्हा किडा अधिकारी चंद्रपूर व सहकारी तसेच चंद्रपूर महानगर पालीका प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तसेच भरती बंदोबस्तातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानुन त्यांच्याकडुन भविष्यात देखील अशीच सहकार्याची अपेक्षा पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांनी बाळगली आहे.