चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्हात अधून मधून सुरू असलेल्या पावसामुळे चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत असून दिनांक १९ जुलै २०२४ सायंकाळी ६ वाजता २०५.७५० मी. इतकी गाठलेली असल्यामुळे इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपुर, माना आणि इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी स्वतः नदीच्या पात्रापासून दूर राहावे तसेच आपली जनावरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. अन्यथा, होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जिवीत किवा वित्त हानीस महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही.
तसेच, इरई धरणाच्या क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धरणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात येतील.
🔴🔴 महत्वाची सूचना 📣📣
ईराई धरणातून दुपारी १ वाजता पाणी सोडण्यात येणार आहे नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहावे.
*इशारा . दिनांक २० जुलै २०२४ सकाळी १० वाजता*
द्वारा . मनपा चंद्रपूर