चंद्रपूर:- मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत.अश्यातच अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीक असलेले तलाव फुटल्याने चिचपल्ली व पिंपळखुट गावातील घराघरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचे फार मोठे नुकसान झाले.तीन दिवस घरात पाणी घुसून असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.अनाज,पाणी, कपडे इतकेच नव्हे अनेकांचे शैक्षणिक दस्तऐवज सुद्धा पुरात वाहून गेले.संकटाच्या घडीत पुरग्रस्तांच्या दुखात साथ देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ जुलै शनिवारला पुरग्रस्त गाव चिचपल्ली व पिंपळखुट येथील नागरिकांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व कुटुंबातील महिलेसाठी एक साडी भेट म्हणून देत त्यांच्या दुखात सहभागी झाले.
अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीकचा तलाव फुटला यात चिचपल्ली येथील ३०० तर पिंपळखुट येथील ११० घरात पाणी शिरले.यात घरातील संसार उपयोगी सामानाचे तसेच धान्य,शैक्षणिक दस्तऐवज पुरात वाहून गेले.काहींचे बकऱ्या व शेती उपयोगी वस्तूही वाहून गेले.यात फार मोठे नुकसान झाले.या संकटाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांसोबत मोठ्या आस्थेने विचारपूस केली व दुःखात मी सोबत आहे असा विश्वास दिला.व चिचपल्ली व पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व महिलांसाठी साडी भेट म्हणून दिले.पुरग्रस्तांच्या मदतीला धावून येत आपल्यातला माणूस असल्याचा त्यांनी परिचय करून दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सिकी यादव,शालिक फाले,विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मधू मेश्राम,युवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे,महिला आघाडीचे जिल्हा संघटीका कल्पना गारगोटे,विनय धोबे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार,राहुल विरुटकर, मा.नगरसेवक सरफराज शेख, नागाळाचे उपसरपंच विनोद पिलरवार, पिंपळखुटचे सरपंच विनोद मेश्राम, बल्लरपूरचे माजी नगरसेवक अमित पाझारे,सागर राऊत,बब्बू पाठक,बाबा साहू,राहुल भोयर,राजू ठाकरे,सूरज घोगे,हेमराज बावने,प्रणित अहीरकर, सिकंदर शेख,गिरीश कटारे,वसीम भाई,सिकंदर शेख.शाबाज शेख,
इलाजभाई, व आदी पदाधिकारी उपस्थित होते.