ओबीसी वसतिगृहासाठी कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यांमध्ये 72 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 2023-24मध्ये वसतिगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले. परंतु, वसतिगृहात अद्यापही प्रवेश देण्यात आलेला नाही. आता महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र यासंदर्भात काहीच हालचाली नसल्याने 5 जुलैला चंद्रपूर येथील सहायक आयुक्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या कार्यालयामध्ये ओबीसी सेवा संघाच्या वतीने मुक्काम आंदोलन करण्यात येत आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग ११ वी व १२ वी) ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी वसतिगृहात प्रवेश द्यावा, तसेच या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करावी, वसतिगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळावे, यासह अन्य मागण्याही करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थी, पालक, कार्यकर्त्यांनी मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन ओबीसी सेवा संघाच्या वतीने सुरू आहे.