गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक #gadchiroli #gadchirolipolice

Bhairav Diwase

सहा तासांच्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा
,
गडचिरोली:- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना यश आले आहे.

या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील वांडोली गावात आणि गडचिरोलीच्या जंगलामध्ये ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तर सहा तास चाललेल्या या चकमकीत C-60 चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले आहेत . ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.