१५ जुलै ऐवजी "या" तारखेला होणार परीक्षा #gondia

Bhairav Diwase
गोंदिया:- जिल्हा पोलिस विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त पोलिस शिपाई भरती प्रकियेची लेखी परीक्षा सोमवार 15 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणात्सव आता ही परीक्षा शुक'वार 19 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता शहराजवळील फुलचूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे घेण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पोलिस विभागात रिक्त 110 जागांसाठी 19 जून ते 5 जुलै या कालावधीत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रर्वगामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी निवड यादी पोलिस मुख्यालयाच्या नोटीस बोर्ड व जिल्हा पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 11 जुलैपर्यंत हरकती/आक्षेप मागविण्यात आले.

यानंतर पात्र उमेदवारांची जवळील फुलचूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे 15 जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र प्रशासकीय कारणात्सव आता ही परीक्षा 19 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता फुलचूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे घेण्यात येणार आहे. पोलिस भरती परीक्षेस पात्र सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कळविले आहे.