चंद्रपूर:- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता / स्वीकारण्याकरिता 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच याबाबतची निवड प्रक्रिया राबवून निवड यादी जाहीर करण्याकरिता 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यानुसार निवड यादी जाहीर करण्याचा सुधारित दिनांक 16 ऑगस्ट 2024 असा राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक आशा कवाडे यांनी केले.