India vs Pakistan Final : पाकिस्तानला नमवून 'भारत' बनला विश्व 'चॅम्पियन'

Bhairav Diwase
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स 2024 च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला आहे. तसेच पुन्हा एकदा भारत विश्वविजेता बनला आहे. हा सामन्या शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता.

बर्मिंगहॅम येथे शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 19.1 षटकात 5 विकेट गमावत 159 धावा करत सामना जिंकला. भारताकडून अंबाती रायडूने सर्वाधिक 50 धावा केल्या. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत इरफान पठानने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स चषकावर भारताचे नाव कोरले.