मुंबई:- मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने'त नाव नोंदणी करण्यासाठी राज्यातील सेतू केंद्र चालकांना ५० रूपये राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे त्यांनी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.३ जुलैला विधान परिषदेत बोलताना दिला.
या योजनेसाठी लाभार्थ्यांचे रेशन कार्ड असेल, तर त्यांना डोमिसाईलची गरज नाही. योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.