चंद्रपूर जिल्ह्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने"च्या नावाचा गैरवापर #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0
पोंभूर्णा:- महाराष्ट्र शासनाने सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये महाराष्ट्रातील महिला भगिनींकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास सहाय्य ठरण्यासाठी महाराष्ट्र सरकारनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंमलात आणलेली असून सदर योजना ही १ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे.


मात्र काही समाजकंटकांनी महाराष्ट्र शासनाच्या सदर योजनेच्या नावाचा गैरवापर करुन नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी "प्रतिभा धानोरकर लाडकी बहिण योजना" या नावाची खोटी योजना तयार करून सोशल मिडीयाव्दारे प्रचार-प्रसार करुन शासनाची तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींची दिशाभूल केली असल्याने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोंभूर्णा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे.

महाराष्ट्र शासनाने सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये महाराष्ट्रातील महिला भगिनीकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास सहाय्य ठरण्यासाठी महाराष्ट्र सरकारनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" अंमलात आणलेली असून सदर योजना ही १ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे. मात्र पोंभूर्णा येथील धम्मा निमगडे यांनी शासकीय योजनेची थट्टा करुन "प्रतिभा धानोरकर लाडकी बहिण योजना" नावाची फसवी योजना व्हॉट्सॲप व्दारे प्रसारीत करुन शासनाची तसेच महिला भगिनींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनाची तसेच महिला भगिनींची दिशाभूल करुन शासनाची थट्टा उडविणाऱ्या धम्मा निमगडे या व्यक्तिंवर कठोरात कठोर गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांना देण्यात आले.


यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, नगरसेविका नंदा कोटरंगे,आकाशी गेडाम,रोहिणी ढोले,माजी नगरसेविका सुनिता मॅकलवार, वैष्णवी वासलवार उपस्थित होते.

विषयाच्या अनुषंगाने पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधिताने समाज माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाचा गैरवापर करून लोकांमध्ये संभ्रम पसरवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला गेला. खोटी माहिती व बनवाबनवी करणाऱ्यावर कारवाई करावी यासाठी पोंभूर्णा पोलिस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांना तक्रार देण्यात आली आहे.
अल्का आत्राम, प्रदेश महामंत्री,भाजपा महिला आघाडी

मला "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" ही योजना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सर्व घटकातील महिलांपर्यंत पोहचवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगायचे होते. ती पोस्ट डिलीट झाली आणि चुकीने "प्रतिभाताई लाडकी बहिण योजना" अशी पोस्ट प्रसारीत झाली. यात माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.
धम्मा निमगडे, प्रसिद्धी प्रमुख, काँग्रेस कमेटी पोंभूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)