Click Here...👇👇👇

मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा नाल्यात बुडून मृत्यू #pombhurna #chandrapur #death

Bhairav Diwase
1 minute read
पोंभूर्णा:- तालुक्यातील खरमत येथील दोघेजण गावाजवळ असलेल्या नाल्यात मासेमारी करण्यासाठी गेले होते.दोघांपैकी एकटा दुपारी दोन वाजताच्या सुमारास काम असल्याने घराकडे परत आला.मात्र त्यातील एकटा मासेमारी करत होता.दरम्यान मासेमारी करतांना पाण्याचा अंदाज न लागल्याने तेथील एकाचा मृत्यू झाला.मनोज लक्ष्मण आत्राम वय (३६) रा.खरमत असे मृतकाचे नाव आहे.सदर घटना दि.९ जुलै मंगळवारला रात्री नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

चढणीचे मासे पकडण्यासाठी दोघे मित्र गावाजवळ असलेल्या नाल्यात मासेमारी करण्यासाठी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गेले होते.मासेमारी करीत असतांनाच दुपारी दोन वाजता अरविंद पेंदोर वय (३७) हा वैयक्तिक काम असल्याने घराकडे परत आला. मात्र मृतक मनोज आत्राम वय (३६) हा उशीरा पर्यंत मासेमारी करत होता. दरम्यान मासेमारी करतांना मनोजला नाल्यातील खड्याच्या पाण्याचा अंदाज लागला नाही. त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. संध्याकाळी मुलगा परत आला नाही म्हणून घरचे व गावकरी मिळून नाल्याकडे गेले असता मनोजचा मृतदेह खड्ड्यात आढळून आला.

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दि.१० जुलै बुधवारला शवविच्छेदन करण्यात आले आहे.मृतकाच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुली आहेत. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत मर्ग दाखल केला आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर करीत आहेत.