निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट
लोकसभा निवडणुकीनंतर आता देशाचं लक्ष महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. पण या निवडणुकांबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमुळं अनेकांचा गैरसमज होत असल्यानं हा मेसेज खरा की खोटा याचा खुलासा निवडणूक आयोगानं केला आहे.
A message is being shared on Whats app regarding schedule for State Assembly elections in #Maharashtra & #Haryana
— Election Commission of India (@ECISVEEP) July 24, 2024
Reality: message is #Fake. No dates have been announced so far by #ECI. Election Schedule is announced by ECI through a press conference.#VerifyBeforeYouAmplify pic.twitter.com/QUoR4MAHGv
निवडणूक आयोगानं ट्विट करुन या व्हायरल मेसेज बाबत माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉट तयार करुन त्यामध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याचं म्हटलं आहे. पण हे खोटं असून अद्याप निवडणूक आयोगानं अधिकृतरित्या या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. योग्य वेळ आल्यानंतर या निवडणुकांच्या तारखा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येतील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.