शेतकामासाठी गेलेल्या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू #chandrapur #mul

Bhairav Diwase
मुल:- तालुक्यामधील भेजगाव येथे शेतकामासाठी गेलेल्या महिलेवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.29) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. लताबाई बंडू चटारे (वय.55) असे मृत महिलेचे नाव आहे. लताबाई ह्या आपल्या शेतामध्ये धान पिकातील निंदण काढण्यासाठी गेल्या होत्या. निंदन काढत असतानाच दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक वातावरणामध्ये बदल झाला.

विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह दमदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे त्या शेतातील झाडाखाली थांबल्या असतानाच वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. शेतामध्ये त्या एकटयाच काम करीत होत्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी तहसिलदार मृदूला मोरे यांच्या आदेशानुसार भेजगावचे तलाठी भास्कर मेश्राम आणि याटावार तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.