चंद्रपूर:- आज दिनांक २३ ऑगस्ट, २०२४ रोजी १०:०० वाजता सुमारास पोलीस स्टेशन नागभीड हद्दीत सोशल मिडीया व्हॉटसॅअपवर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती पडताच नागभीड पोलीसांनी त्याची तात्काळ दखल घेवुन व्हिडीओ मधील पिडीत महिलेचा शोध घेवून तिची ओळख पटविण्यात आली. लागलीच सदर व्हिडीओ मधील आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला असता सदर गुन्ह्यात सामील सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगुन सदर व्हिडीओचे घटनास्थळ नागभीड बस स्थानकातील मुत्रीघर मधील असुन दिनांक १२/०८/२०२४ च्या मध्यरात्री दरम्यान पिडीत/मनोरुग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहुन तिला मुत्रीघरात नेवुन तिचेसोबत एका आरोपीने बळजबरीने अतिप्रसंग केला त्यावेळी त्याच्यातील दुसऱ्या आरोपीने मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढले असुन इतर आरोपींनी गुन्हा करण्यास सहकार्य केले.
सदर आक्षेपार्ह व्हिडीओ त्यातील एका आरोपीने त्याचे एका मित्राला व्हॉटसॲप वर पाठविले असता त्याने सदर व्हिडीओ वेगवेगळे लोकांना व्हॉटसॲपद्वारे पाठवुन सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे.
सदर आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन नागभीड येथे अपराध क्रमांक २६२/२०२४ कलम ६४ (२) (क), ७० (१), ८७, १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ६७, ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर ठोसरे यांनी तात्काळ भेट देवुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन मनोरुग्ण महिलेस तातडीचे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले असुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकीस आणुन पिडीता व आरोपीतांची ओळख पटविण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, सपोनि श्री दिलीप पोटभरे, पोउपनि अनुराधा फुकट पोस्टे. नागभीड, पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड, पोस्टे. सिंदेवाही, सपोनि श्री अजीतसिंग देवरे, पोस्टे. तळोधी, सपोनि प्राची राजुरकर, सपोनि श्री राजकिरण मडावी पोस्टे ब्रम्हपुरी तसेच गुन्हे शोध पथकाचे पोउपनि विनोद भुरले, पोउपनि रोशन इरपाचे व स्टॉफ तसेच सायबर व फॉरेन्सिक एक्स्पर्टची टिम यांनी सदर गुन्हा काही तासाचे आंत उघडकीस आणुन मोलाची कामगिरी बजावली आहे.
चंद्रपूर पोलीसांद्वारे आवाहन करण्यात येते की, सदर घटने संदर्भाने कोणताही व्हिडीओ समाज माध्यमावर पाठवु नये किंवा कोणतीही अफवा पसरवू नये जेणे करुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे कृत्य केल्यास संबंधीतांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.