पोंभुर्णा:- शहरातील जुना बसस्टँड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नाव देण्यात यावे ही मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते भुजंग ढोले यांनी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते; आज त्यांच्या उपोषणाची सांगता झाली असून पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार नगरपंचायतीतील नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंंगळगिरीवार, विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, नगरसेवक संजय कोडापे, दर्शन गोरंटीवार, महेश रणदिवे, गणेश वासलवार, अतुल वाकडे, बालाजी मेश्राम, अभिषेक बद्दलवार, नंदू बुरांडे, नगरसेविका नंदाताई कोटरंगे, आकाशी गेडाम, श्वेता वनकर, रामेश्वरी वासलवार, रीना उराडे, रोहिणी ढोले, शारदा गुरनूले, उषा गोरंतवार यांनी सर्वसंमतीने ठराव करून स्थानिक जुना बसस्टँड चौकाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात येईल असे पत्रकचं उपोषणकर्त्या भुजंग ढोले यांना दिले. याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थित राहून जुना बसस्टँड चौक यापुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक म्हणून ओळखला जाईल, असे सांगत आनंद व्यक्त केला.
दि. १६ ऑगस्टपासून भुजंग ढोले यांचे आमरण उपोषण सुरू होते; त्यांच्या मागणीची दखल घेऊन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आजच्या आज उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करून नगरपंचायतीच्या माध्यमातून तसा ठराव करण्याच्या सुचना दिल्या. नगरसेवकांनी सर्वसंमतीने ठराव करून उपोषणकर्त्या भुजंग ढोले यांना ठरावाची प्रत सुपूर्त केली. त्यामुळे उपोषणस्थळी नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार व शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे यांचे हस्ते लिंबूपाणी पिऊन भुजंग ढोले यांनी उपोषण संपविले.
पुढे बोलताना देवराव भोंगळे म्हणाले, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची दारे उघडली. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असले तरी पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे नामकरण करण्यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यशस्वी प्रयत्न केले. यासोबतच पोंभुर्णा शहरातील विविध समाजाच्या नागरिकांनी विकासासंदर्भात केलेल्या प्रत्येक मागणीला पुर्ण करण्याचे काम ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले आहे. किंबहुना पोंभुर्ण्यात माळी समाज बांधवांकरीता भव्य सामाजिक सभागृहाची निर्मीती सुद्धा त्यांनी केली. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नेहमीच जातीपातीच्या वर जाऊन महापुरुषांचा सन्मान केला. असे सांगून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या आमच्यासाठी ऊर्जेचे स्त्रोत आहेत. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनातून केले. यावेळी भाजपा नेते राजेंद्र महाडोळे व नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गुरूनूले, ओमदेव पाल, बाजार समितीचे सभापती रवी मरपल्लीवार, नगराध्यक्ष सुलभा पिपरे,उपाध्यक्ष अजित मंंगळगिरीवार,विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, नगरसेवक संजय कोडापे,दर्शन गोरंटीवार,महेश रणदिवे, गणेश वासलवार, अतुल वाकडे, बालाजी मेश्राम, अभिषेक बद्दलवार, नंदू बुरांडे, नगरसेविका नंदाताई कोटरंगे, आकाशी गेडाम, श्वेता वनकर, रामेश्वरी वासलवार, रीना उराडे, रोहिणी ढोले, शारदा गुरनूले, उषा गोरंतवार, संचालक रवींद्र गेडाम, शहर महामंत्री गुरूदास पिपरे, चरण गुरनूले, गजानन मडपूवार, तालुकाध्यक्ष अजय मस्के, नैलेश चिंचोलकर, वर्षा लोनबले, धनराज सातपुते, राकेश गव्हारे, सुनील कटकमवार, राजु ठाकरे, मारोती मोहुर्ले, जितेंद्र चुदरी, राहुल पाल, अमोल मोरे, शेखर व्याहाडकर यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.