एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णाः- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत गोडवाना विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या क्रेडीट सिस्टम प्रमाणे अभ्यासक्रमाला अद्यावत करण्यासाठी सदर कार्यशाळा महत्वाची मानली जात आहे.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी नाविण्यपूर्ण, हुशार मध्यम व सामान्य विद्यार्थ्यांच्या दृश्टीने न्यायपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्याच्या सुचना केल्या. वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रबोर्ती यांनी विद्याशाखेंच्या विकासासाठीचा दृष्टीकोन समोर ठेऊन अभ्यासक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली, तसेच अशा महत्वाच्या कार्यशाळांची गरज असल्याचे सांगीतले. विद्यापरीषदेचे सन्माननिय सदस्य डॉ. जयदेव देशमुख यांनी वाणिज्य शाखेच्या एकंदरीत विविध आयामी असल्याची माहिती दिली. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष मनिष पोतनुरवार यांनी अभ्यासक्रम सोपा बनवण्या ऐवजी उद्योजकांच्या व सेवायोजकांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्याचे आवाहन केले. आयोजक तथा कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर नक्षिणे यांनी आयोजनात सहकार्य करणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवरांनी केलेल्या कार्याचा आढावा व्यक्त केला.

लेखाकर्म व सांख्यकी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तमचंद कांबळे यांनी संपूर्ण क्रेडीट सिस्टम व अभ्यासमंडळाच्या अभ्यासक्रमाचे विवेचन केले तसेच वााणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहूल सावलीकर, व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. तात्याजी गेडाम, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयेश चक्रबोर्ती यांनी आपापल्या अभ्यासमंडळाच्या अभ्यासक्रमांवर प्रकाश टाकला. सहभागींनी प्रश्नोत्तर व चर्चेत सहभाग नोंदवला.

यावेळी विद्यापीठ परीक्षेत्रातील अनेक प्राचार्य, विणिज्य शाखेचे बरेच प्राध्यापक व अन्य मंडळी आभासी पध्दतीने उपस्थित होते. डॉं पूर्णिमा मेश्राम यांनी सुत्रसंचालन केले, डॉ. ओमप्रकाश सोनोने यांनी प्रास्तावीक केले तर प्रा. नितीन उपर्वट यांनी आभार मानले यशस्वीततेसाठी चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.