सिंदेवाही:- मुलाखतीला नेण्याच्या बहाण्याने उमरेडला नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी समोर आली. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आकाश टेंभुर्णे रा. सिंदेवाही यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS)अंतर्गत ६४ एम २ चा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित २३ वर्षीय युवती आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत उमेरड येथे चारचाकी वाहनाने मुलाखतीसाठी जात होती. दरम्यान तिच्या परिचयाचाच असलेल्या आकाश टेंभुर्णे यांने एकारा गावाजवळ ती चारचाकी थांबवली. तिला आपल्या दुचाकीने उमरेडला घेऊन गेला. त्याने तिला एका लॉजवर अत्याचार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने आपल्या वडिलांना माहिती दिली. त्यांनी सिंदेवाही पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पुढील तपास सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात एपीआय अतुल स्थूल करीत आहेत.