चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडीत जाणाऱ्या मुलीची केली छेडखानी #Chandrapur #chimur

Bhairav Diwase
0
चिमूर:- चिमूर तालुक्यात 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अंगणवाडीत जात असतांना शाळेसमोरील रस्त्यावर आरोपी अमोल अनिल माहुरे 25 वर्ष राहणार लोहारा यांने पिडीत मुलीला तीच्याकडे असलेल्या बॉटलमधले पाणी मागीतले असता व पिडीत मुलीने पाणी न दिल्याने आरोपीने पीडीताचे पाठीवर चापट मारून व तिचे छातीवर हात लावुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने आरोपी विरुद्ध अप.क्र.156/2024 कलम 115 (2), 74 भारतीय न्याय संहीता, (BNS) सहकलम 8 बालकांचे लैगींक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 पोक्सो अंतर्गत भिसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद फिर्यादिच्या तोंडी रिपोर्ट वरून करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पो.स्टे. प्रभारी अधिकारी सपोनि. जितेंद्र चांदे, ठाणेदार,पो. स्टे. भिसी यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि.रविंद्र वाघ, पो.स्टे.भिसी करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)