चंद्रपूर:- मुली, महिलांवरील अत्याचाराचा घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, मुलीच्या सुरक्षेसाठी तसेच समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांच्या महिलांनी एकत्र येत चंद्रपूर जागृती मशाल मंच स्थापन केला आहे. या माध्यमातून आज दि. 31 ऑगस्टला रोजी रात्री 9:30 वाजता गांधी चौक येथून जटपुरा गेट मार्गे प्रियदर्शनी चौकापर्यंत मशाल मार्च काढण्यात येणार आहे. या माध्यमातून समाजामध्ये जागरुकता वाढविणे, एकजुटता दाखवणे, सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी हा मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपुरात आज मध्यरात्री निघणार भव्य मशाल मोर्चा #Chandrapur
शनिवार, ऑगस्ट ३१, २०२४
0
Tags