बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या 53 वर्षीय डेप्युटी स्टेशन मास्टरने चालत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पिडीत विद्यार्थिनी बल्लारपूर ते चंद्रपूर महाविद्यालयात ये-जा करतात. विद्यार्थिनी सकाळी बल्लारपूरहून बस स्थानकावर असताना आरोपी मिर्झा बेग याने त्यांना छेडले.
सायंकाळी 5 वाजता विद्यार्थिनींनी घरी परतल्यावर कुटुंबियांना घडला प्रकार सांगितला. संबंधित मुलींचे पालक स्थानकावर पोचले. धक्कादायक म्हणजे आरोपी बेग तिथे हजर होता. त्याने पुन्हा मुलींना छेडण्याचा प्रकार केला. संतापलेल्या कुटुंबीयांनी मिळून रेल्वे अधिकरी बेग याला बेदम मारहाण केली आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यात नेले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपींविरुद्ध पोस्को, 74 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.