चंद्रपूर:- देशभरात तसेच राज्यभरात सद्धा लहान मुलींवर अत्याचार झालेल्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. याबरोबरच आता चंद्रपुरात दुसरीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
संशयित आरोपी महादेव गोरडवार (वय.५२) असे नाव आहे. आठ वर्षाच्या चिमुकली विद्यार्थिनीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून 52 वर्षीय संशयित आरोपीने विनयभंग केल्याची घटना नागभिड तालुक्यात उघडकीस आली आहे. संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. एक आठवडाभरापूर्वी नागभिड येथे एका मतिमंद महिलेवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
नागभिडमधील एका गावात सुट्टीच्या दिवशी आठ वर्षीय चिमुकली खेळत असतांना गावातीलच एका संशयित आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून विनयभंग केला. घटनेच्या दोन-तीन दिवसानंतर चिमुकलीने हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी या घटनेची तक्रार नागभिड पोलिसांत केली. तक्रारीनंतर पोस्को अतंर्गत संशयितावर गुन्हा दाखल करून गुरुवारी (दि.29) नागभिड ग्रामीण रुग्णालयातून संशयित आरोपी महादेव गोरडवार (वय.५२) याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या मुलीच्या पालकाने आरोपीच्या चांगलाच चोप दिल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते.