Click Here...👇👇👇

फरार आरोपी शिक्षकांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या #chandrapur #warora #arrested

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातील दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्याथींनीला वाढदिवसाचे निमित्ताने आपल्या रुमवर बोलावून तिला चाकलेट देवुन रिटर्न गिफ्ट मध्ये गळे मिल, हग कर असे म्हणुन जबरीने विद्याथींनीस गळे लागून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थीनीने कशीबशी आपली सुटका करुन त्यांच्या तावडीतून सुटून पळ काढला व पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार नोंदविली असता वरोरा पोलीसांनी तात्काळ त्याची दखल घेवुन दोन्ही फरार शिक्षकांविरुध्द गुन्हा नोंद करुन सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी फरार आरोपीचा शोध घेणे सुरु केला.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात शोध पथक तयार करुन त्याचे समवेत सायबर पथक पाठवून शोधाशोध घेतली असता दोन्ही शिक्षक हे रेल्वे स्टेशनतून पळ काढण्याच्या तयारीत असतांना त्या दोघांना ताब्यात घेवून वरोरा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांचे स्वाधीन करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिक्य तांबडे पोलीस स्टेशन वरोरा हे करीत आहे.

शिक्षक पेशीला काळीमा फासणारे फरार शिक्षकांना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्वामीदास चार्लेकर, अजय बागेसर, अमोल सावे, नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, नितीन रायपुरे, प्रफुल्ल गारगाघे स्थानिक गुन्हे शाखा पथकासह सायबर टिम चे मुजावर अली, कार्तिक खनके, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे व उमेश रोडे यांनी कामगिरी केली.