Akshay Shinde's encounter with the police: अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Bhairav Diwase

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर

मुंबई:- बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून नेत असताना अक्षयने रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.



मिळाळेल्या माहितीनुसार, बदलापूर शाळेतली दोन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. आज तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. अक्षयला जीपमधून नेत असताना मुंब्रा बायपास इथं पोहोचल्यावर अचानक अक्षयने एपीआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्व्हर हिसकावली. यावेळी त्याने पोलिसांवरच 3 राऊंड फायर केले. पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. अक्षयच्या डोक्याला एक गोळी लागली तर दुसरी शरिरावर लागली. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या गोळीबार एक पोलीस अधिकारीही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पण, अक्षयचा मृत्यू झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.