सध्या सोशल मीडिया वर खूप मोठा Cyber Scam सुरू आहे. व्हॉटसॲप ग्रुपवर Android APK फाईल पाठवून साध्या सरळ लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. हे थांबवण्यासाठी सर्व नागरिकांना सजग करणे अत्यावश्यक आहे.
काय आहे APK स्कॅम?
हा Scam प्रामुख्याने ग्रूपवर APK फाईल पाठवून केला जात आहे.
APK फाईल मुळे स्मार्टफोन मध्ये ॲप्लिकेशन इंस्टॉल होते.
हॅकर किंवा Scammer अशी APK फाईल ग्रूपमध्ये पाठवत आहेत की जी इंस्टॉल केल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक आणि OTP त्यांच्यापर्यंत पोहचतो, आणि बँकेतील पैसे लुटता येतात.
APK फाईल ला PM किसान फॉर्म, SBI Bank किंवा लाडकी बहिण अशी नावे दिली जातात जेणे करून सामान्य माणूस फसून हे ॲप इंस्टॉल करेल.
सध्या महाराष्ट्रातील खूपच ग्रूपवर अश्या files फिरत आहेत, ज्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.
काय करावे किंवा करू नये:
व्हॉटसॲप ग्रूप मध्ये आलेली कोणतीही APK फाईल वर क्लिक करू नका.
APK फाईल्स पाठवणाऱ्याला तुमच्या ग्रूप मधून काढून टाका.
अशा फाईल्स इतरांना शेअर करू नका.
जनजागृती करा, हा Scam थांबवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.